Wednesday, January 28, 2015

संक्षिप्त चालू घडामोडी 28 जानेवारी 2015

 • महाराष्ट्राचा ‘पंढरीची वारी’या संकल्पनेवरील चित्ररथ राजपथावरील पथसंचलनात सहभागी झाला.
 • महाराष्ट्राच्या चित्ररथाचे संकल्पनाचित्र कला दिग्दर्शक चंद्रशेखर मोरे यांचे.
 • ख्यातनाम व्यंगचित्रकार आर.के लक्ष्मण यांचे पुण्यात वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले.
 • कॉमन मॅन हे त्यांचे गाजलेले व्यंगचित्र.RKLaxman
 • त्याचप्रमाणे 'टनेल ऑफ टाइम' हे आत्मचरित्र मराठीत ' लक्ष्मण रेषा' म्हणून प्रसिद्ध आहे.
 • रासिपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण असे त्यांचे पूर्ण नाव होते.
 • 24 ऑक्टोबर 1924 रोजी म्हैसुर येथे त्यांचा जन्म झाला होता.
 • मोठे बंधु प्रसिध्द लेखक आर.के नारायण यांनी त्यांच्यातील व्यंगचित्रकलेला प्रोत्साहन दिले.
 • मुंबईतील सर जे.जे. कला माहाविद्यालयात व्यंगचित्रकलेसाठी त्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. 
 • त्यांना पद्मविभुषण, पद्मभुषण, रेमनमॅगॅसेसे आणि इतर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्वाचे पुरस्कार मिळाले.
 • आर.के नारायण यांच्या मालगुडी डेज या पुस्तकासाठीही त्यांनी व्यंगचित्र काढली होती.
 • 'द सर्व्हंट्स ऑफ इंडिया', हॉटेल रिवेरा या पुस्तकांव्यतिरिक्त 'द मेसेंजर' व 'द एलोक्युएंट ब्रश' इत्यादी पुस्कं प्रसिद्ध आहेत.
 • शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची राजकीय काराकीर्द सुरु होण्यापूर्वी आर. के. लक्ष्मण व बाळासाहेबांनी व्यंगचित्रकार म्हणून एकत्र काम केले होते.
 • पुण्यात शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार.
 • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर.के. लक्ष्मण यांचे स्मारक होणार अशी घोषणा केली आहे.
 • शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात ठसा उमटवणारे रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रावसाहेब शिंदे यांचे  निधन झाले.
 • रोपांच्या आरोग्याबाबत केलेल्या सुधारणा आणि प्रमाणपत्र यंत्रणेतील दूर केलेल्या त्रुटींमुळे युरोपीय समुदायाने अलीकडेच भारतीय आंब्यावरील प्रवेशबंदी दूर केली.
 • अर्थात भाज्यांवरील बंदी उठविण्याबाबत मात्र इतक्यात निर्णय घेण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
 • युरोपियन आयोगाच्या समितीची बैठक ब्रुसेल्स येथे झाली. त्यात आंब्यावरील बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला. फळझाडांच्या आरोग्याबाबतच्या नियामक समितीच्या बैठकीत सदस्य देशांतील तज्ज्ञांनीही ही बंदी उठवण्याच्या बाजूने स्पष्ट मत दिले.
 • भारताच्या एकूण फळ व भाजीनिर्यातीत युरोपीय समुदायाचा वाटा 50 टक्के.
 • ब्रिटन हा सर्वात मोठा आयातदार. त्याखालोखाल नेदरलँड, जर्मनी आणि बेल्जियमचा क्रम.
 • भारतातून आयात झालेल्या आंब्यात कीड आढळून आली आणि त्यामुळे युरोपातील पिकांना धोका उत्पन्न होईल, या भीतीने 1 मे 2014 रोजी लागू झालेली आंब्याची प्रवेशबंदी डिसेंबर 2015 पर्यंत लागू राहाणार होती.
 • ओबामा यांनी दिल्लीतील भाषणात  मेरी कॉम यांचा उल्लेख केला.
 • कोझीकोड येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटचा माजी विद्यार्थी अक्षय जाधव याला व्हिक्टोरिया राणीचा प्रतिष्ठेचा तरुण नेतृत्व पुरस्कार जाहीर झाला असून त्याने नायजेरियातील वंचित विद्यार्थी व आदिवासींच्या सहकारी संस्थांच्या उत्थानासाठी  त्याने मोठे काम केले आहे.
 • 26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्यघटना अस्तित्वात आली.
 • 26  जानेवारी 1963 मध्ये मोर हा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आला.
 • 1950 च्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडला इंडोनेशियाचे अध्यक्ष सुकर्णो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
 • माध्यमसम्राट रूपर्ट मरडॉक यांनी वृत्तपत्रात आणलेली पेज थ्री संस्कृतीला अखेर त्यांच्याच द सन या टॅब्लॉइड वृत्तपत्राने मूठमाती दिली असून टॉपलेस महिलांच्या छायाचित्रांचा समावेश असलेले हे पानच बंद केले आहे.
 • "ऑक्‍सफॅम चॅरिटी‘ या संस्थेने आपल्या अहवालात जगातील निम्मी संपत्ती ही या एक टक्का लोकांच्या ताब्यात असेल, असा अंदाजव्यक्त केला आहे.
 • जगात सर्वांत श्रीमंत असलेल्या एक टक्का लोकांनी जमविलेली संपत्ती ही 2016 पर्यंत अन्य 99 टक्के लोकांच्या संपत्तीपेक्षा अधिक होण्याची शक्‍यता आहे.
 • अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था "नासा‘ आणि राष्ट्रीय महासागर व वातावरण प्रशासन प्राधिकरण या संस्थांनी केलेल्या अभ्यासामधून  हरितगृह वायूंच्या उत्सर्जनामध्ये होणाऱ्या वाढीच्या पार्श्‍वभूमीवर 2014 हे वर्ष पृथ्वीच्या इतिहासामधील सर्वांत उष्ण वर्ष ठरले.
 • गरीब आणि मध्यम उत्पन्न गटांतील जनतेसाठी नवनवीन योजना राबविण्यासाठी अमेरिकेतील श्रीमंत तसेच उच्च उत्पन्नगटाच्या आर्थिक संस्थांकडून अतिरिक्त कर वसूल करण्याची अध्यक्ष बराक ओबामा यांची योजना आहे.
 • उच्च उत्पन्न गटांसाठी भांडवली नफा तसेच लाभांश करात 28 टक्‍क्‍यांनी वाढ करण्यात येण्याची शक्‍यता आहे. तसेच अन्य उच्च उत्पन्न असलेल्या 100 आर्थिक संस्थांच्या करामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात येण्याची शक्‍यता आहे. या वाढीमुळे येत्या 10 वर्षात 32 हजार कोटी डॉलर्स एवढा अतिरिक्त कर सरकारी तिजोरीत जमा होणार आहे.
 • हा महसूल समाजातील गरीब तसेच मध्यमवर्गाकरिता राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी उपयोगात आणण्यात येणार आहे.
 • यापूर्वी अशा प्रकारचा प्रयोग करण्यात आला असून परंतु त्याला मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याने तो थांबविण्यात आला होता.
 • केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी हरियानातील रेवाडी स्थानकावर "सीएनजी‘ (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) इंधनावर आधारित दोन रेल्वे गाड्यांना हिरवा कंदील दाखविला. 
 • रेवाडी ते रोहतक आणि रेवाडी ते बिकानेर अशा दोन मार्गांवर या गाड्या धावणार.
 • "सीएनजी‘वर आधारित या पहिल्याच रेल्वे गाड्या.
  या रेल्वे सेवेमुळे प्रदूषणामध्ये घट तर होईलच पण त्याचबरोबर पारंपरिक इंधनाचा वापर करण्याची आवश्‍यकता भासणार नाही. भारतीय रेल्वेचे डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी "सीएनजी‘चा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. विविध टप्प्यांमध्ये देशभरात हा प्रकल्प राबविला जाणार आहे.
 • रेवाडी-रोहतक दरम्यानचे 81 किलोमीटरपर्यंतचे अंतर कापण्यासाठी या गाडीला केवळ 20 टक्‍के इंधन लागेल. भविष्यामध्ये रेल्वे पूर्णपणे इकोफ्रेंडली व्हाव्यात म्हणून सौर आणि पवनऊर्जेचा वापर करण्याचा प्रयत्न.
 • सीएनजी‘ रेल्वेची वैशिष्ट्ये
  • ‘सीएनजी डिझेल इलेक्‍ट्रिक मल्टिपल युनिट‘ हे द्विइंधन प्रणालीवर आधारित, इंधन म्हणून डिझेल बरोबरच "सीएनजी‘चाही वापर करण्यात येईल.
  • चेन्नईमधील "इंटेग्रल कोच फॅक्‍टरी‘मध्ये रेल्वेची निर्मिती
  • ‘सीएनजी‘मुळे इंजिन चालविण्याच्या खर्चात 50 टक्‍के बचत
  • कार्बन मोनोक्‍साइडच्या उत्सर्जनात 90 टक्‍के कपात होणार
  • कार्बन-डाय-ऑक्‍साइडचे उत्सर्जन 25 टक्‍क्‍यांनी घटणार
  • नायट्रोजन ऑक्‍साइडचे उत्सर्जन 35 टक्‍क्‍यांनी कमी होणार
 • शार्ली हेब्दो नियतकालिकावर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदविण्यासाठी फ्रान्समधील शंभरपेक्षा अधिक चित्रपटागृहांमध्ये या नियतकालिकावर आधारित विशेष डॉक्‍युमेंट्री फिल्म दाखविण्यात येणार आहे.
 • या हल्ल्याचा निषेध करून अभिव्यक्ती स्वातंत्र्याला पाठिंबा देण्याच्या उद्देशाने ही फिल्म दाखविण्यात येणार आहे. "इट्‌स हार्ड टू बी लव्हड बाय इडिएट्‌स‘ या नावाची ही शॉर्ट फिल्म डॅनियल लिकोन्ते यांनी दिग्दर्शित केली आहे.
 • चीनचे प्रभावशाली गुप्तचर विभाग प्रमुख मा जियान यांची भ्रष्टाचाराच्या आरोपांतर्गत चौकशी करण्यात येत असल्याचे वृत्त आहे.तंत्रज्ञान क्षेत्रामधील एका मोठ्या कंपनीच्या आर्थिक गैरव्यवहारासंदर्भातील चौकशीदरम्यान मा यांचे नाव सर्वप्रथम प्रकाशात आले होते.
 • लोहखनिज आणि इतर खनिज खाणींच्या लिलावासंबंधीच्या अध्यादेशाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाने पाच जानेवारीला या अध्यादेशाला मंजुरी दिली होती.
 • या अध्यादेशामुळे लोहखनिज व इतर खाणींचे (कोळसा खाण वगळता) वाटप करण्यासाठी स्पर्धात्मक लिलावाची दारे उघडी झाली आहेत. तसेच, यामुळे प्रकल्पबाधित नागरिकांच्या कल्याणासाठी जिल्हा खनिज निधीही उभारता येणार आहे.
 • संसदेच्या हिवाळी अधिवेशनात खाण मंत्रालयाला यासंबंधीचे दुरुस्ती विधेयक मांडता आले नव्हते. त्यामुळे सरकारला अध्यादेशाचा मार्ग अवलंबावा लागला आहे.
 • या अध्यादेशामुळे केंद्राने आपल्या अधिकारांचे विकेंद्रीकरण करत त्यांच्याकडील स्रोतांचे वाटप करण्याचे अधिकार राज्य सरकारला देण्यात आले आहेत.
 • उद्योग संघटनांनी मात्र या अध्यादेश मार्गाला विरोध केला होता.
 • #yeswecan हा हॅशटॅग वापरून विकासासाठी आणखी काय करायला हवे, यासंदर्भात आपले मत मांडा - नरेंद्र मोदी यांचे आवाहन.
 • आमिर खानचा पीके चित्रपट आता चीनमध्येही प्रदर्शित होणार
 • माहिती अधिकारातून समोर आलेल्या आकडेवारी नुसार भारताच्या रिझर्व बँकेकडे डिसेंबर 2014 पर्यंत 557.75 टन सोने असून याचे बाजारमूल्य 1176.6 अब्ज रुपये ऐवढे आहे,
 • अक्षयकुमारच्या बेबी या चित्रपटाला पाकिस्तानच्या सेन्सॉर बोर्डानं बंदी घातली आहे.
 • ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक अरूण साधू यांना कुसूमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर झाला आहे.
 • आतापर्यंतच्या राजशिष्टारांना बाजुला सारत पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचे स्वागत दिल्ली विमानतळावर जाऊन केले.
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लंडनमधील निवासस्थान महाराष्ट्र सरकार 35 कोटी रुपयांना विकत घेणार असल्याचे निश्चित झाले आहे.

आता PDF स्वरूपात वा प्रिंटआउट काढण्यासाठी खालील PrintFriendly ह्या बटणाचा वापर करा.

Print Friendly and PDF
सविस्तर वाचा...... “संक्षिप्त चालू घडामोडी 28 जानेवारी 2015”

Monday, January 26, 2015

Republic day Special

maharashtra भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा rd

अशोकचक्र
शांतता काळात दाखविलेल्या शौर्याबद्दल दिला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार
नाईक नीरजकुमार सिंह (मरणोत्तर)
मेजर मुकुंद वरदराजन (मरणोत्तर)
तीन जणांना मरणोत्तर कीर्तिचक्र
कॅप्टन जयदेव, नायब सुभेदार कोश बहादूर गुरंग आणि सुभेदार अजय वर्धन यांना मरणोत्तर कीर्तिचक्र
नऊ जणांना शौर्यचक्र
लेफ्टनंट कर्नल संकल्प कुमार (मरणोत्तर), मेजर मुकुल शर्मा, मेजर अभिजय (मरणोत्तर), मेजर आशुतोष कुमार पांडे, मेजर आर. वंशिकृष्णन, मेजर बिभांषू धोंडियाल, मेजर स्वरूपकुमार घोराय, पॅराट्रूपर बलविंदरसिंग (मरणोत्तर) आणि रायफलमन मंगाराम यांना शौर्यचक्र
देशभरातील विविध पोलिस सेवांमधील 967 अधिकारी, कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेबद्दल पदके जाहीर
राष्ट्रपतींचे पोलिस शौर्यपदक 25 जणांना जाहीर झाले आहे, तर 132 जणांना पोलिस शौर्यपदक
विशेष सेवेबद्दल 98 जणांना राष्ट्रपतींचे पोलिस पदक आणि उल्लेखनीय सेवेबद्दल 712 जणांना पोलिस पदक
यात महाराष्ट्रातील 40 अधिकारी- कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील पुरस्कारविजेते
राष्ट्रपतींचे पोलिस शौर्यपदक

1) हेड कॉन्स्टेबल गणपत नेवरू मडावी (मरणोत्तर)

पोलिस शौर्यपदक
1) पोलिस नाईक गिरधर नागो अत्राम (मरणोत्तर)
2) पोलिस उपअधीक्षक यशवंत अशोक काळे
3) उपनिरीक्षक प्रकाश व्यंकट वाघमारे
4) पोलिस नाईक सदाशिव लखमा मडावी
5) पोलिस नाईक गंगाधर मदनय्या सिदाम
6) कॉन्स्टेबल मुरलीधर सखाराम वेलाडी
7) उपनिरीक्षक अतुल श्रावण तलवडे
8) उपनिरीक्षक अंकुश शिवाजी माने

9) पोलिस नाईक विनोद मेस्सो हिचामी
10) कॉन्स्टेबल सुनील तुकडू मडावी (मरणोत्तर)
11) पोलिस नाईक इंदरशाह वासुदेव सादमेक
12) सहायक निरीक्षक राजेंद्रकुमार परमानंद तिवारी
13) उपनिरीक्षक संदीप अंशाबापू म्हस्के
14) उपनिरीक्षक अविनाश अरुण गडाख
15) हेडकॉन्स्टेबल रमेश कोल्हुजी येडे
16) पोलिस नाईक वामन सहदेव पारधी
17) पोलिस नाईक राधेश्‍याम सीताराम गाते
18) पोलिस नाईक उमेश भगवान इंगळे
19) अधीक्षक मोहम्मद सुवेझ मेहबूब हक
विशिष्ट सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलिस पदक
1) के. एल. बिश्‍नोई, अतिरिक्त पोलिस महासंचालक, कायदा सुव्यवस्था, मुंबई
2) संजय बर्वे, अतिरिक्त पोलिस महासंचालक, रेल्वे, मुंबई
3) अशोक बागमारे, असिस्टंट कमांडंट, राज्य राखीव पोलिस दल, नागपूर
4) राजन पाली, उपअधीक्षक, फुलगाव डिव्हिजन, वर्धा
5) सदाशिव पाटील, हेडकॉन्स्टेबल, क्राईम ब्रांच, कोल्हापूर

उल्लेखनीय सेवेबद्दल पोलिस पदक
1) सुरेशकुमार मेकाला, पोलिस आयुक्त, अमरावती
2) शशिकांत माने, पोलिस अधीक्षक, प्राचार्य पीटीएस, नागपूर
3) माधव कारभारी, सहायक अधीक्षक, बीड
4) निताराम कुमारे, सहायक आयुक्त, विशेष शाखा, नागपूर शहर
5) बळिराम कदम, सहायक आयुक्त, गुन्हे शाखा, सीआयडी, मुंबई
6) छगन देवराज, उपअधीक्षक, पोलिस मुख्यालय, नाशिक ग्रामीण
7) सोपान पवार, निरीक्षक, विधानभवन सुरक्षा व्यवस्था, मुंबई
8) प्रदीप सुर्वे, पोलिस निरीक्षक, जातपडताळणी समिती, नवी मुंबई
9) ज्ञानदेव गवारे, निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव
10) गौतम गडमाडे, सशस्त्र पोलिस निरीक्षक, राज्य राखीव पोलिस दल, अमरावती
11) बळिराम जीवतोडे, पोलिस निरीक्षक, पोलिस प्रशिक्षण केंद्र, नागपूर
12) सुरेश भोयर, पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा, गोंदिया
13) पंडित पवार, पोलिस उपनिरीक्षक, सिन्नर पोलिस ठाणे, नाशिक ग्रामीण
14) शिवाजी धुरी, सशस्त्र पोलिस उपनिरीक्षक, राज्य राखीव पोलिस दल, पुणे
15) दामोदर सिंह, सशस्त्र पोलिस उपनिरीक्षक, राज्य राखीव पोलिस दल, नागपूर 

कारागृहांमधील कर्मचाऱ्यांसाठीही सुधारक सेवा पुरस्कारांची घोषणा झाली आहे.
महाराष्ट्रातील पुरस्कार विजेते

1) रवींद्र राम पवार, हवालदार, जाधव जेल ऑफिसर्स ट्रेनिंग कॉलेज, येरवडा, पुणे
2) तात्यासाहेब सदाशिव निंबाळकर, जेलर ग्रेड - 2, येरवडा केंद्रीय कारागृह, पुणे
3) संजीत रघुनाथ कदम, हवालदार, येरवडा केंद्रीय कारागृह, पुणे
4) दिगंबर सदाशिव विभूते, शिपाई, कोल्हापूर जिल्हा कारागृह


पद्मविभूषण
1. लालकृष्ण अडवानी, गुजरात
2. अमिताभ बच्चन, महाराष्ट्र
3. प्रकाशसिंग बादल, पंजाबचे मुख्यमंत्री
4. डॉ. डी. वीरेंद्र हेगडे, सामाजिक कार्य, कर्नाटक
5. मोहम्मद युसूफ खान ऊर्फ दिलीप कुमार, महाराष्ट्र
6. जगद्गुरू रामानंदचार्य स्वामी रामभद्राचार्य, उत्तर प्रदेश
7. प्रा. मलुर रामस्वामी श्रीनिवासन, विज्ञान आणि अभियांत्रिकी, तमिळनाडू
8. कोट्टयम के. वेणुगोपाल, दिल्ली
9 करीम अल हुसैनी, आगाखान, उद्योग आणि व्यापार, फ्रान्स

नऊ पद्मविभूषण, 20 पद्मभूषण आणि 75 पद्मश्री अशा एकूण 104 पद्म सन्मानांची घोषणा
16 परदेशी नागरिकांचाही या पुरस्कारार्थींच्या यादीत समावेश
सायना नेहवाल हिच्या नावाचा क्रीडामंत्रालयाने शिफारस करूनही पद्म पुरस्कारासाठी विचार झालेला नाही
"मायक्रोसॉफ्ट‘चे प्रणेते बिल गेट्‌स आणि मेलिंडा गेट्‌स यांना पद्मभूषण, तर महाराष्ट्रातून चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, संगीतकार रवींद्र जैन, जाहिरात क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व असलेले प्रसून जोशी, डॉ. प्रल्हाद, शेखर सेन, दिवंगत धार्मिक नेते सैय्यदना मोहम्मद बुऱ्हानुद्दीन यांना पद्मश्री
सविस्तर वाचा...... “Republic day Special”

Saturday, January 24, 2015

संक्षिप्त चालू घडामोडी 24 जानेवारी 2015

 • राज्यात 26 जानेवारी 2015 रोजी "जलमुक्त शिवार अभियान" चे उद्घाटन होणार आहे.
 • ग्रामविकास खात्याच्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत 10 हजार गावं दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प करण्यात येणार आहे.
 • ग्रामविकास मंत्री: पंकजा मुंडे
 • देशातील नागरिकांशी मनमोकळा संवाद साधण्यासाठी पंतप्रधानांनी आकाशवाणीच्या माध्यमातून सुरू केलेल्या 'मन की बात' या मासिक कार्यक्रमात प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे बराक ओबामा सहभागी होणार आहेत. खुद्द पंतप्रधानांनीच ट्विटरद्वारे ही घोषणा केली.
 • 27 जानेवारी रोजी या कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात येणार आहे
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी  2015 रोजी हरियाणामध्ये सुकन्या समृद्धी योजनेचा शुभारंभ केला.
 • पाच मुलींच्या नावाने बँक खाते उघडून त्याची कागदपत्रे मुलींकडे सोपवण्यात आली.
 • काय आहे नेमकी ही योजना हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
 • सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सला आयपीएलमध्ये खेळता येणार नाही.
 • शिवाय, माजी न्यायाधीशांची त्रिसदस्यीय समिती पुढील सहा महिन्यांमध्ये राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्जच्या शिक्षेवर निर्णय घेणार.
 • भारतात गेल्या सहा महिन्यात ज्या घटना घडल्या आहेत त्यात हिंदुत्ववादी राजकारणाचा उदय दिसत असून त्यामुळे देशात बहुसंख्याकवादाचा धोका नाकारता येत नाही, असे मत अमेरिकी इतिहासकार डेव्हिड लेलिव्हेल्ड यांनी व्यक्त केले आहे.
 • भारतीय संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून 27 फेब्रुवारी रोजी आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात येणार आहे; तर 26 फेब्रुवारी रोजी रेल्वे अर्थसंकल्प मांडण्यात येणार असून 28 फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.
 • याच अधिवेशनात सहा अध्यादेशांचे कायद्यात रूपांतर केले जाणार आहे.
 • मायक्रोसॉफ्टने 'विंडोज -10' या प्रचालन प्रणालीची (ऑपरेटिंग सिस्टिम) नवी अद्ययावत आवृत्ती बाजारात आणली असून, त्याच्या बरोबरीने 'होलोलेन्स' या त्रिमितीय परीधानक्षम गॅजेटचेही अनावरण केले. या उपकरणाद्वारे वापरकर्त्यांना त्रिमितीय प्रतिमांच्यामार्फत संवाद साधणे शक्य होणार आहे
 • सौदी अरेबियाचे राजे अब्दुल्ला यांचे निधन झाले. अमेरिकेशी असलेले घनिष्ट मैत्रीपूर्ण संबंध आणि सौदीसारख्या पुराणमतवादी देशातील विचार बदलण्यासाठी त्यांनी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे ते जगभरात प्रसिद्ध होते. किंग अब्दुल्ला बिन अब्दुलाझिझ अल सौद यांच्या  राजवटीत सौदीतील स्त्रियांना प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. राजे अब्दुल्ला यांच्यानंतर त्यांचे सावत्र बंधु प्रिन्स सलमान यापुढे सौदी अरेबियाची गादी सांभाळणार.
 • देशात वाघांच्या संख्येत 30.5 टक्के वाढ झाली आहे. यंदाच्या म्हणजे2014 च्या गणनेत देशभरात 2,226 वाघ आढळून आले. 2010 मध्ये ही संख्या 1,706 होती.  गेल्या तीन वर्षात 520 वाघांची भर पडली आहे.
 • प्रभावी वनव्यवस्थापन, जनसहभाग आणि व्याघ्रसंवर्धनासाठी सरकारने केलेले प्रयत्न यामुळे वाघांच्या संख्येत वाढ झाली.
 • जागतिक स्तरावरील व्याघ्रसंवर्धनाच्या प्रयत्नात महत्त्वाचे योगदान देण्याची भारताची इच्छा असून यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला बछडे दान करण्यास भारत तयार आहे.
 • वाघ आढळणाऱ्या 18 राज्यांमधल्या 3,78,118 चौ. कि.मी. वनक्षेत्रात हे सर्वेक्षण करण्यात आले.
 • कर्नाटक, उत्तराखंड, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ या राज्यात वाघांची संख्या आढळल्याचे या सर्वेक्षणात आढळून आले.
 • पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ बुधवारी संपला. पाटील यांनी 22 जानेवारी 2010 रोजी पंजाबच्या राज्यपाल पदाचा कार्यभार स्वीकारला होता.
 • केंद्र सरकारच्या कार्मिक, तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाचा निवृत्तीवेतन आणि निवृत्त व्यक्ती कल्याण विभाग राष्ट्रीय ई-प्रशासन उपक्रमांतर्गत "पेन्शनर्स पोर्टल" सुरू करत आहे.
 • याखेरीज निवृत्त व्यक्तींच्या कौशल्याचा आणि अनुभवाचा सामाजिक कार्यासाठी उचित उपयोग करून घेण्यासाठी "संकल्प" हा उपक्रमही विभागाने सुरू केला आहे.
 • निवृत्तीवेतनधारकांचे तक्रार निवारण तसेच निवृत्ती आणि निवृत्तीवेतनाशी संबंधित मुद्यांवर माहिती आणि मार्गदर्शन करणे, या "पेन्शनर्स पोर्टल" प्रकल्पामागचा मूळ हेतू आहे.
 • भारतीय निवडणूक आयोग 25 जानेवारीला देशभरात पाचवा राष्ट्रीय  मतदार दिन साजरा करत असून यंदाची  संकल्पना “सोपी नोंदणी, सोपी दुरुस्ती” अशी आहे.
 • राष्ट्रीय कार्यक्रम नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु स्टेडिअमच्या भारत्तोलन सभागृहात माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या अध्यक्षतेखाली  होणार आहे.
 • निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाली असून मतदारनोंदणी वाढवणे, खासकरुन पात्र नवमतदारांची  नोंदणी करुन घेणे हे राष्ट्रीय मतदार दिनाचे उद्दिष्ट आहे.
 • एलपीजी ग्राहकांसाठीच्या थेट लाभ हस्तांतरण योजनेअंतर्गत आतापर्यंत 2262 कोटी रुपये अनुदान लाभार्थ्यांना हस्तांतरीत करण्यात आले आहे. आतापर्यंत 9 कोटी ग्राहकांना या योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आले असून हा आकडा देशातील एलपीजी ग्राहकांपैकी 60 टक्के इतका आहे.
 • एलपीजीवरील अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याच्या उद्देशाने सरकारने ही योजना सुरू केली आहे.
 • केंद्रीय सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ चित्रपटनिर्माते पहलाज निहलानी यांची नियुक्ती करण्यात आली. पूर्वीच्या सरकारने नियुक्त केलेल्या अध्यक्षा लीला सॅम्सन यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. निहलानी  तीन वर्षे या पदावर राहतील.
 • भारतीय लष्करात अद्यापपर्यंत महिलांना प्रत्यक्ष युद्धभूमीवर काम करायचीdivya-ajith परवानगी नाही. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला होणाऱ्या संचलनात कॅप्टन दिव्या अजित या पहिल्या महिला तुकडीचे नेतृत्व करणार आहेत. कॅप्टन दिव्या या लष्कराच्या हवाई संरक्षण तुकडीच्या कॅडेट आहेत त्यामुळे, लष्करातील महिला अधिकाऱ्यांना युद्धभूमीवर लवकरच संधी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
 • चेन्नईमध्ये 2010 ला झालेल्या अधिकारी प्रशिक्षण अकादमीच्या दीक्षान्त समारोहात कॅप्टन दिव्या यांना "स्वोर्ड ऑफ ऑनर‘चा सन्मान मिळाला होता.
 • लष्कराच्या इतिहासात महिला अधिकाऱ्याला प्रथमच हा सन्मान मिळाला होता.
 • अस्तंगत होत चाललेल्या गिधाडांची संख्या वाढत असल्यामुळे चर्चेत आलेले अभयारण्य: कुनो वन्यजीव अभयारण्य (मध्य प्रदेश)        
 • 2003 मध्ये मोठ्या संख्येने मरण पावल्यामुळे गिधाडे अस्तंगत होण्याचा धोका निर्माण झाला होता.
 • येमेनमधील शिया बंडखोरांनी अध्यक्ष अब्द्राबु मन्सूर हदी यांच्या प्रासादावर कब्जा केल्याचा निषेध म्हणून आणि हदी यांच्या समर्थनार्थ एडनमधील अधिकाऱ्यांनी बुधवारी एडन विमानतळ बंद केला.
 • हुथी म्हणून ओळखले जाणारे हे शिया बंडखोर अब्दुल मलिक अल-हुथी याच्या नेतृत्वाखाली येमेनच्या घटनेच्या मसुद्यातील बदलांना विरोध करत आहेत
 • संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनेही या हल्ल्यांचा निषेध केला आहे.
 • हाफीझ सईद याच्या जमात उद दावा या अतिरेकी संघटनेवर तसेच धोकादायक अशा हक्कानी नेटवर्कवर पाकिस्तानने बंदी घातली आहे.
 • 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधार हाफीझ सईद यांच्या परदेशगमनावरही बंदी घालण्यात आली आहे.
 • राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 वरून 58 करण्याचा हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर सरकारचा निर्णय पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने वैध ठरविला आहे.
 • वेब ॲप्लिकेशनसंदर्भात 'Mysecurity.in' हे वेब पोर्टल सुरू करण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी घेतला आहे. कुठलीही व्यक्ती, विद्यार्थी, कंपनी, स्वयंसेवी संस्था लोकांना उपयुक्त असे "सिक्युरिटी ॲप्लिकेशन" या पोर्टलवर पाठवू शकते. मंत्रालयाने स्थापन केलेला तज्ज्ञ गट त्याची वेगवेगळ्या निकषांवर समीक्षा करेल. सुरक्षेच्या लेखापरीक्षणात उत्तीर्ण होणाऱ्या ॲप्लिकेशनांच संकेतस्थळावर परवानगी दिली जाईल.
 • रशियाचे संरक्षण मंत्री सर्जेई शोगू  अलीकडेच त्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली.
आपला हा उपक्रम असाच सुरू राहावा असे तुमचे मत असल्यास डाव्या बाजूच्या फेसबुक लाईक ला क्लिक करा.

आता PDF स्वरूपात वा प्रिंटआउट काढण्यासाठी खालील PrintFriendly ह्या बटणाचा वापर करा.

Print Friendly and PDF
सविस्तर वाचा...... “संक्षिप्त चालू घडामोडी 24 जानेवारी 2015”

बेटी बचाव बेटी पढाव

 • हरियाणा येथील पानिपत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते "बेटी बचाव बेटीBeti-Bachao-Beti-Padao पढाव" ' (save girl child and educate her)या योजनेचे 22 जानेवारी 2015 ला उद्‌घाटन करण्यात आले.
 • बाललिंग गुणोत्तर सुधारणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून मुलींच्या सबलीकरणाला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
 • सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश मिळून देशातल्या निवडक 100 जिल्हयात ही योजना राबविण्यात येणार आहे.
 • या जिल्हयात बाल लिंग दर, हा 1000 मुलांमागे 918 मुली या राष्ट्रीय दरापेक्षा कमी आहे.
 • महिला आणि बाल कल्याण मंत्रालय, मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालय संयुक्तपणे ही योजना राबविणार आहेत.
 • या योजनेची व्याप्ती (कंसात संबंधित राज्यातील योजने अंतर्गत एकूण जिल्हे): अंदमान-निकोबार बेटे (1), आंध्र प्रदेश (1), अरुणाचल प्रदेश (1), आसाम (1), बिहार (1), चंदिगड (1), छत्तीसगड (1), दादरा-नगर हवेली (1), दमण व दिव (1), गोवा (1), गुजरात, हरियाणा (12), हिमाचल प्रदेश (1), जम्मू काश्मीर (5) (5), झारखंड (1), कर्नाटक (1), केरळ (1),  लक्षद्विप (1),मध्य प्रदेश (4), महाराष्ट्र (10),मणिपूर (1), मेघालय (1),मिझोराम(1), नागालँड (1), दिल्ली (5), ओदिशा (1), पुद्दूचेरी (1), पंजाब (11), राजस्थान (10), सिक्कीम (1), तामिळनाडू (1), तेलंगणा (1), त्रिपुरा (1), उत्तरप्रदेश (10),उत्तराखंड (2), पश्चिम बंगाल (1)
 • बेटी बचाव, बेटी पढाव  योजनेंतर्गत  महाराष्ट्रातले 10 जिल्हे: बीड, जालना, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, बुलडाणा, वाशिम, उस्मानाबाद, कोल्हापूर आणि सांगली.
 • 2011 च्या जनगणनेनुसार सीएसआर (बाल लिंगगुणोत्तर) आणि 2015-16 मधील जिल्हयानुसार गाठण्याचे उद्दिष्ट : बीड 2011 चे बाललिंग गुणोत्तर 807 (उद्दिष्ट 925), जालना 870 (उद्दिष्ट 938), जळगाव 842 (899), अहमदनगर 852 (929), औरंगाबाद 858 (880), बुलडाणा 855 (872), वाशिम 863 (928),  उस्मानाबाद 867(928),  कोल्हापूर 863 (910) आणि सांगली 862 (उद्दिष्ट 865).
 • योजनेअंतर्गत महत्त्वाच्या बाबी – गर्भधारणेची पहिल्या तिमाहीतच अंगणवाडी केंद्रांमध्ये नोंद, एकात्मिक बाल विकास योजनेची सेवा विस्तारणे, रुग्णालयात प्रसूती करण्याचे प्रमाण वाढवणे, जन्मनोंदणी आणि गर्भपूर्व निदान तंत्रज्ञान कायद्याची काटेकोर अंमलबजावणी.
 • शिक्षण हक्क कायद्याची काटेकोर अंमलबजावणी, मुलींची शाळांमध्ये नोंदणी, मुलींना अनुकूल अशा शाळांना प्रोत्साहन, मुलींच्या शाळागळतीचा दर घटण्यासाठी  पावले उचलणे, यांचा “बेटी पढाव” उपक्रमात  समावेश आहे.
 • याखेरीज  मुलगे-केंद्रीत  रुढीरिवाजांमध्ये बदल घडवणे यावरही याअंतर्गत भर दिला जाणार आहे.
 • “बेटी बचाव बेटी पढाव” मोहिमेसाठी बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दिक्षितची ब्रॅण्ड  ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती  करण्यात आली आहे.
 • 22 जानेवारी 2015 ला उद्‌घाटन  करताना "बेटी बचाव बेटी पढाव" अशी प्रतिज्ञा देणाऱ्या स्टॅम्पचेही अनावरण पंतप्रधानांनी केले, शिवाय  केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या "बेटी बचाव बेटी पढाव" ध्वनिचित्र वाहनांना मोदी यांच्या हस्ते रिमोटद्वारे हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
 • ज्या 100 जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे त्या जिल्ह्यात ही वाहने या योजनेसंदर्भात जनजागृती करतील.  यामध्ये महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांचा समावेश आहे.
 • याशिवाय,  मुलींसाठी बचतीचे साधन असलेल्या "सुकन्या समृध्दी योजनेचेही" यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले
 • हरियाणातील बाल लिंग गुणोत्तर परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे या योजनेच्या उद्‌घाटनासाठी हरियाणाची निवड करण्यात आली होती.
 • संकल्पना:
  • लिंग गुणोत्तर : दर 1000 पुरुषांमागील स्त्रियांचे प्रमाण
  • बाल लिंग गुणोत्तर:  0 ते 6 वर्षे वयोगटातील 1000 मुलग्यां(Male Child) मागचे मुलींचे (Female child)प्रमाण.
हेही वाचा:
सुकन्या समृध्दी योजना
सविस्तर वाचा...... “बेटी बचाव बेटी पढाव”

सुकन्या समृध्दी योजना

 • हरियाणा येथील पानिपत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते "बेटी बचाव बेटीSukanya-Samriddhi पढाव" या योजनेचे 22 जानेवारी 2015 ला उद्‌घाटन करण्यात आले. बाललिंग गुणोत्तर सुधारणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून मुलींच्या सबलीकरणाला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
 • तसेच, “बेटी बचाव बेटी पढाव” मोहिमेंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारी 2015 ला हरियाणातल्या पानिपत येथे “सुकन्या समृध्दी खाते” योजना सुरु करण्यात आली.
 • मुलींसाठी बचतीचे साधन असलेली "सुकन्या समृध्दी योजना" ही योजना आहे.
 • यावेळी 10 वर्षांखालील पाच मुलींना पंतप्रधानांच्या हस्ते बँक खात्यासंबंधीची कागदपत्रे प्रदान करण्यात आली. 
 • भारतीय टपाल खात्याच्या वतीने तयार करण्यात आलेल्या "बेटी बचाव बेटी पढाव" टपाल तिकिटाचेही पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
हेही वाचा:
"बेटी बचाव बेटी पढाव" योजना
 • मुलीच्या जन्मापासून 10 वर्षांपर्यंत  मुलींच्या नावाने  1000 हजार रुपयांच्या किमान ठेवीसह कधीही सुकन्या समृध्दी खाते उघडता येईल. त्यानंतर 100 च्या पटीत  रक्कम ठेवता येईल.
 • एका वित्तीय  वर्षात कमाल दीड  लाख रुपये खात्यात जमा करता येऊ शकतील.
 • ही योजना सुरु करण्याच्या एक वर्ष अगोदर ज्या मुली 10 वर्षांच्या झाल्या आहेत, त्याही या योजनेसाठी पात्र ठरतील.
 • खाते देशभरातल्या कुठल्याही  पोस्ट ऑफिसमध्ये किंवा वाणिज्य बँकांच्या अधिकृत शाखांमध्ये  मुलीच्या जन्माचा दाखला घेऊन उघडता येईल.
 • खातेधारक मुलीला 10 व्या वर्षी  स्वत:च्या खात्याचे  व्यवहार स्वत: करता येतील.
 • खाते उघडल्याच्या तारखेपासून ते 21  वर्ष किंवा वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यावर लग्न यापैकी जे  आधी घडेल तोवर  खाते कार्यरत राहील.
 • खातेधारक मुलीच्या उच्च शिक्षणाच्या खर्चाची गरज पूर्ण करण्यासाठी 18 वर्षे  पूर्ण  झाल्यावर ठेवीचा काही भाग मुलीला खात्यातून काढता येईल.  मुलींचे लवकर लग्न करण्याला आळा  घालण्यासाठी 18 वर्ष पूर्ण  होईपर्यंत मुलीच्या खात्यातून  पैसे काढता येणार नाहीत, अशी तरतूद या  योजनेत करण्यात आली आहे.
 • मुलीच्या नावे खाते उघडण्यासाठी आणि तिच्या कल्याणाकरिता बचतीचा अधिकाधिक  भाग तिच्या नावे  जमा करण्यासाठी  पालकांना प्रोत्साहन  देण्याकरिता  ठेवींवर चालू आर्थिक वर्षात प्राप्तिकर सवलत देण्याचे तसेच वार्षिक  संयुक्त आधारे 9.1 टक्के  व्याजदर  देण्याचे प्रस्तावित  आहे.
 • राष्ट्रीय बचत योजनेअंतर्गत जमा झालेली मिळकतीमुळे केंद्र आणि राज्य सरकारांच्या आर्थिक विकासात्मक योजनांना स्रोत उपलब्ध होणार आहे. यामुळे या खात्यांमध्ये जमा झालेल्या पैसा पायाभूत विकासांना आर्थिक पाठबळ म्हणून सरकारकडे उपलब्ध होणार आहे तसेच यामुळे देशातील बचतीचा दर वाढण्यातही मदत होणार आहे.
सविस्तर वाचा...... “सुकन्या समृध्दी योजना”