Tuesday, April 16, 2013

प्रश्नमंजुषा - 16 एप्रिल 2013


प्रश्नमंजुषा -365
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या सुधारित अभ्यासक्रमातील पर्यावरण या घटकावर आधारित प्रश्नमंजुषा

1. पश्चिम घाट संरक्षणाकरिता केंद्र सरकारने स्थापन केलेल्या माधव गाडगीळ समितीची सदस्य संख्या किती होती ?

A. 9
B. 11
C. 13
D. 15

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

C. 13
2. पश्चिम घाट संरक्षणाकरिता केंद्र सरकारने स्थापन केलेल्या माधव गाडगीळ समितीने पश्चिम घाटाची वर्गवारी किती प्रकारात केली ?

A. 2
B. 3
C. 5
D. 9

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

B. 3
स्पष्टीकरण: परिस्थिती विज्ञानाच्या दृष्टीने संवेदनशील भाग I, II आणि III अशी वर्गवारी केली गेली.
3. पश्चिम घाटासंदर्भात कोणत्या मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली मंत्रीगट स्थापन केला गेला होता ?

A. शरद पवार
B. जयराम रमेश
C. मल्लिकार्जुन खडग़े
D. कपिल सिब्बल

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

B. जयराम रमेश
4. पेंच राष्ट्रीय उद्यान राज्याच्या कोणत्या जिल्ह्यात आहे ?

A. गडचिरोली
B. चंद्रपूर
C. नागपूर
D. गोंदिया

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

C. नागपूर
5. संयुक्त राष्ट्रांनी 'जैवविविधता दशक' म्हणून जाहीर केलेला कालावधी कोणता ?

A. 2001-2010
B. 2006-2015
C. 2011-2020
D. 2012-2021

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

C. 2011-2020
6. 'बुक ऑफ इंडियन बर्डस' हे पक्षीनिरीक्षणावरील ख्यातनाम पुस्तक पक्षीतज्ञाने लिहिले ?

A. मारुती चितमपल्ली
B. डॉ.सतीश पांडे
C. सलीम अली
D. रुवेन योसेफ

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

सलीम अली
7. राष्ट्रीय नदी संरक्षण योजनेंतर्गत देशातील किती नद्यांचा समावेश करण्यात आला आहे ?

A. 42
B. 34
C. 16
D. 7

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

B. 34
8. हरित न्यायाधिकरणा(Green Tribunal)ची स्थापना भारत सरकारने 18 ऑक्टोबर 2010 रोजी केली. असे करणारा भारत हा जगातील कितवा देश होता ?

A. पहिला
B. तिसरा
C. तेरावा
D. सत्तेचाळीसावा

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

A. पहिला
9. पर्यावरण संदर्भातील 'रोल मॉडेल' ठरलेले 'मेंढा-लेखा' हे गाव राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?

A. ठाणे
B. नंदूरबार
C. औरंगाबाद
D. गडचिरोली

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

D. गडचिरोली
10. 'क्योटो प्रोटोकॉल' मुळे सर्वपरिचित झालेले क्योटो हे शहर कोणत्या देशात आहे ?

A. ब्राझील
B. स्वीडन
C. जपान
D. ऑस्ट्रेलिया

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

C. जपान

Follow us by Email Absolutely FREE

Share for Care

आपण ह्या ब्लॉगच्या URL लिंक्स शेअर केल्यात तर आम्हाला आनंदच वाटेल.
You can share the links to this blog.

हे पोस्ट वाचणाऱ्यांनी हेही वाचलेत